
कुडाळ येथे शहर राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने दिवाळीनिमित्त बुधवारी सायंकाळी बैलगाडी सजावट, सुदृढ बैल व रेडा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. आ.वैभव नाईक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, नगराध्यक्षा आफरीन करोल यांच्या हस्ते सहभागी स्पर्धकांचा गौरव करण्यात आला.
यावेळी जिजामाता चौक, गांधीचौक, बाजारपेठ, पानबाजारमार्गे हाॅटेल गुलमोहर अशी मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, जिल्हा चिटणीस प्रकाश जैतापकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट,नगराध्यक्षा सौ.आफरीन करोल,शिवसेना नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका सौ.अक्षता खटावकर, जिल्हा बॅंक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, रिमेश चव्हाण, उल्हास शिरसाट, मंदार चंद्रकांत शिरसाट, चिन्मय बांदेकर, तरबेज शेख, तौसीफ शेख, बख्तावर मुजावर, सुंदरवल्ली स्वामी, वैभव आजगांवकर, मयुर शारबिद्रे आदींसह शेतकरी आणि नागरीक उपस्थित होते.