पानांपासून- फळांपर्यंत आरोग्यासाठी गुणकारी आहे वटवृक्ष

WhatsApp Group

भारतात अनेक धार्मिक कार्यात वडाच्या पानाला पूजेत वापरले जाते. वडाचे झाड अतिशय पवित्र वृक्ष मानले जाते. वटवृक्ष आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे आणि ते शरीराला अनेक प्रकारे आरोग्यदायी फायदे देतो ते कसे हे जाणून घ्या.

  • वडाच्या झाडाची मुळे चघळल्याने हिरड्यांचे आजार, दात किडणे आणि हिरड्यांमधून रक्त येणे थांबते. त्याची बाह्य मुळे नैसर्गिक टूथपेस्ट म्हणून काम करतात आणि श्वासाची दुर्गंधी दूर करण्यास देखील मदत होते. त्यामुळे दातही मजबूत होतात.
  • वडाच्या फळात मॅग्नेशियम, फॉस्फरस, ओमेगा ३ आणि ६ सारखी नैसर्गिक खनिजे आहेत जी रक्तदाब कमी करण्यासाठी आणि हृदयरोगासाठी उपयुक्त असतात.
  • वडाच्या झाडाच्या सालीचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होईल. तसेच सालीमुळे अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.

Vat Purnima Ukhane: वटसावित्री पौर्णिमा स्पेशल काही भन्नाट उखाणे…

  • वडाच्या पानांच्या कळ्याचा वापर अतिसार आणि आम्लपित्तावर उपायकारक ठरेल. तसेच अतिसारापासून लवकर आराम मिळण्यास मदत होते.
  • वजन कमी करण्यासाठी वटवृक्षाच्या फळांचा रस दूध (Milk) आणि साखरेशिवाय प्यायल्याने प्रभावी ठरेल. वडामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत करतात.
  • वडाच्या फळामध्ये अ, क आणि ई जीवनसत्त्वे (Vitamins) जास्त प्रमाणात असल्यामुळे ते आपली दृष्टी चांगली राखण्यास मदत करतात.

वटपौर्णिमा मराठी शुभेच्छा संदेश