
Uttarakhand Bus Accident: उत्तराखंडमधील यमुनोत्री महामार्गावर प्रवाशांची बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये 28 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यापैकी 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर जखमी अवस्थेततील प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. उत्तरकाशी येथे झालेल्या या बस अपघातावर पंतप्रधान मोदींनी दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत पंतप्रधान मोदींनी जाहीर केली आहे.
अब तक 25 लोगों की मौत की खबर आई है। हमारी तरफ से सभी राहत और बचाव कार्य किए जा रहे हैं। डीएम और एसपी को मौके पर भेजा गया है। गृहमंत्री ने NDRF की टीम मौके पर भेजी है। SDRF की टीम मौके पर पहुंच गई है: उत्तराखंड के मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी pic.twitter.com/ZFpKPaJgus
— ANI_HindiNews (@AHindinews) June 5, 2022
या अपघाताची (Accident) माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. २५ मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात झालेल्या बसचा चालक दोन दिवसांपासून झोपला नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केले आहे तसेच जखमींवर उपचार करण्यासाठी आणि मृतदेह राज्यात आणण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.