पणजी – यावेळी गोव्याच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. ते गोव्यातील पणजी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांचे अनेक दिवसांपासून भाजपशी वाद सुरू होते आणि आता त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
I will be contesting as an Independent candidate from Panaji constituency: Utpal Parrikar, son of late former CM Manohar Parrikar#GoaElections pic.twitter.com/FsBomEeRwk
— ANI (@ANI) January 21, 2022
गेल्या अनेक दिवसांपासून उत्पल यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे सुरू होते, आरोप-प्रत्यारोपांचा काळ सुरू होता. याचा परिणाम असा झाला की भाजपने आपल्या पहिल्या यादीत उत्पल यांना उमेदवार म्हणून घोषित केले नाही आणि आता ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
उत्पल पर्रिकर यांच्या अपक्ष निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे भाजपला मात्र मोठा धक्का बसला आहे. पणजी मतदारसंघात आता भाजपसमोर ईतर पक्षांसोबतच उत्पल पर्रिकर यांचेही कडवे आव्हान असणार आहे.
ताज्या बातम्या –
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती, प्रात्यक्षिक परीक्षेची तारीख जाहीर
राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता
T20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने