
पावसाळ्याच्या दिवसांत वातावरण गार आणि ओलसर असते. पावसाळ्याच्या दिवसांत(Rainy Season) मजा तर सर्वजण करतात. मात्र पावसाळ्यात घरातील अन्न (Food Storage In Monsoon) योग्य पद्धतीने साठवणे घरातील महिलांसामोर एक आव्हान असते. पावसाळ्याच्या दिवसात हवेतील उच्च आर्द्रता (Humidity) म्हणजेच ओलावा स्नॅक्स, कुकीज, बिस्किटे आणि इतर खाद्यपदार्थांच्या शेल्फ लाइफवर (Food Shelf Life) परिणाम करतो. हवामानामुळे अन्नपदार्थ ओलसर होतात आणि मूळ चव देखील गमावतात.
खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी या टिप्स वापरा
पावसाळ्याच्या दिवसांत काचेच्या बरणीमध्ये वेगवेगळे स्नॅक्स एकत्र ठेवू नये. काचेच्या भांड्यामध्ये स्नॅक्स व्यवस्थित पॅक करा आणि नंतर ते साठवा. स्नॅक्समधील मीठ आणि साखरेचे प्रमाण पावसाळ्यात ओलाव्यामुळे ओलसर बनवते. त्यामुळे वेगवेगळे अन्नपदार्थ वेगळ्या कंटेनरमध्ये ठेवणे चांगले.
स्वयंपाकघरामध्ये किंवा घरात कुठेही ओलसर जागा असेल अशा ठिकाणी खाद्यपदार्थ ठेवले तर त्यांना बुरशीचा धोका वाढतो. ओलावा असलेली ठिकाणे ही बुरशी आणि जंतूंच्या वाढीसाठी आदर्श स्थिती आहे. म्हणून बुरशीची वाढ टाळण्यासाठी अन्न किंवा स्नॅक्स ओलसर ठिकाणी ठेवू नका. ते व्यवस्थित पॅक करून रॅकमध्ये ठेवा.
जेव्हा स्नॅक्स पॅकेटमध्ये साठवले जातात तेव्हा ते ओलावा आणि आर्द्रतेमुळे ओले होण्याची अधिक शक्यता असते. त्यांना घट्ट असलेल्या काचेच्या भांड्यामध्ये ठेवणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. हवाबंद काचेच्या भांड्यात अन्नपदार्थ साठवल्यामुले त्यांची शेल्फ लाइफ वाढते.
पावसाळ्याच्या दिवसांत फराळाचे पदार्थ किंवा खाद्यपदार्थ जास्त काळ सूर्यप्रकाशात ठेवणे टाळा. यामुळे पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात अन्नपदार्थांचा सूर्यप्रकाशाशी होणारा संपर्क कमी करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो.