
पाकिस्तानतील कराचीमधील एक हॉटेल सध्या वादात सापडले आहे. या हॉटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt) व्हिडीओचा वापर केला आहे. आलियाच्या गंगूबाई काठिवाडी (Gangubai Kathewadi) या चित्रपटातील एका प्रसंगाचा व्हिडीओ या हॉटेलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करून या हॉटेलने पुरूष ग्राहकांना 25 टक्के खास सूट जाहीर केली आहे.
कराचीमधील हॉटेल स्विंगनं हा प्रकार केला आहे. या हॉटेलने गंगूबाई काठियावाडीतील व्हिडीओ शेअर केला आहे. या सिनेमात आलियाने एका वेश्येची भूमिका केली आहे. ही वेश्यानंतर एका मोठ्या वेश्यालयाची मालकीन होते. या सिनेमामध्ये एक सिन आहे. त्यामध्ये आलिया ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हाताने ग्राहकांना बोलावत असते. स्विंग हॉटेलने याच प्रसंगाचा वापर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी केला आहे. ‘आजा ना राजा किसका इंतजार है’ या कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
View this post on Instagram
कराचीतील हॉटेलने प्रसिद्धीसाठी केलेल्या या प्रकारानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘तुमची कृती योग्य ठरवण्यासाठी या प्रकारच्या प्रसंगाचा वापर करणे मूर्खपणा आहे’, अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे. तर आणखी एका इन्स्टाग्राम युझरने या प्रकारच्या कृतीने तुम्हाला काही ग्राहक मिळतील पण ही चुकीची पद्धत आहे,’ या शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.