
भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत सध्या बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत चर्चेत आहे. उर्वशीच्या एका वक्तव्यानंतर दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले. ऋषभ पंत हा तिला भेटण्यासाठी हॉटेलच्या बाल्कनीमध्ये तिची वाट पाहत होता, असं उर्वशीने थेट नाव न घेतला सूचित केलं होतं. त्यावर ऋषभने इन्स्टा स्टोरी लिहित उर्वशीला उत्तर दिलं. ‘लोकप्रियता मिळवण्यासाठी काही जण खोटं बोलतात’, असंच तो थेट या पोस्टमध्ये म्हणाला होता. आता त्यावर उर्वशीनेही इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये उर्वशीने ऋषभला ‘छोटू भैय्या’ असं खोचकपणे म्हटलं आहे. त्यामुळे या दोघांमधील वाद आता चर्चेचा विषय ठरला आहे.
या पोस्टमध्ये उर्वशीने ऋषभ पंतला छोटू भैया असे संबोधले असून पंतला क्रिकेट खेळण्याचा सल्लाही दिला आहे. छोटू भैय्याने बॅट-बॉलच खेळलं पाहिजे. बदनाम होण्यासाठी मी काही मुन्नी नाहीय. डार्लिंग तुला रक्षाबंधनच्या शुभेच्छा’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे. त्यासोबतच ‘आरपी छोटू भैय्या’, ‘शांत मुलीचा फायदा घेऊ नकोस’ अशा आशयाचे हॅशटॅग्स दिले आहेत.
View this post on Instagram
याआधी ऋषभने इंस्टाग्राम स्टोरीवर एक नोट पोस्ट केली होती, जी उर्वशीसाठीच होती असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. ऋषभने मात्र त्यात तिचं नाव घेतलं नव्हतं. “फक्त लोकप्रियतेसाठी आणि हेडलाईन्समध्ये झळकण्यासाठी काही लोक मुलाखतींमध्ये कसं खोटं बोलतात हे मजेशीर आहे. काही लोक प्रसिद्धी आणि नावासाठी भुकलेले आहेत याचं वाईट वाटतं. देव त्यांना आशीर्वाद देवो,” अशी पोस्ट त्याने केली होती. यासोबतच त्याने ‘मेरा पिछा छोडो बहन’, ‘झूठ की भी सीमा होती है’ असे हॅशटॅग दिले होते.
उर्वशी रौतेलाने नुकतीच एक मुलाखत दिली होती, ज्यामध्ये तिने आरपीबद्दल एक किस्सा सांगितला आणि म्हणाली, ‘मी वाराणसीमध्ये शूटिंग करून दिल्लीला आले होते जिथे माझा शो होणार होता. मी दिवसभर शूटिंग केले. आरपी मला भेटायला आले होते आणि ते लॉबीमध्ये माझी वाट पाहत होते. 10 तासांच्या शूटिंगनंतर मी परत आले तेव्हा मी थकले होते त्यामुळे मी झोपी गेले. मला कितीतरी वेळा फोन आला, पण मला कळले नाही. मला जाग आली तेव्हा मला 16-17 मिस्ड कॉल्स दिसले. तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मग मी त्याला म्हणाले की तू मुंबईला आल्यावर भेटू. आम्ही मुंबईत भेटलो पण पापाराझींमुळे खूप मोठा ड्रामा झाला.
उर्वशीने जेव्हा एका क्रिकेटरला डेट करत असल्याचं जाहीर केलं होतं, तेव्हा सर्वांनी तो क्रिकेटर ऋषभ पंत आहे, असा अंदाज लावला. मात्र या चर्चांना त्याने साफ नकार दिला होता आणि तिला सोशल मीडियावर ब्लॉकही केलं होतं.