
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकाचा दुसरा सामना दुबईत खेळला जात आहे. हा सामना पाहण्यासाठी राजकारणापासून बॉलिवूडपर्यंतचे स्टार्स पोहोचले आहेत. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचली आहे.
भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दक्षिण भारताचा सुपरस्टार विजय देवरकोंडा दुबईला पोहोचला आहे. आशिया चषकाच्या या सामन्यापूर्वी त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम, भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण आणि क्रिकेट अँकर मयंती लँगर यांच्याशी चर्चा केली.
अभिनेत्री उर्वशी रौतेला ही ऋषभ पंतची एक्स गर्लफ्रेंड हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे मीडियामध्ये अनेकदा बोलले जात होते. मात्र, उर्वशी आणि पंत यांनी याबाबत काहीही सांगितले नाही.अलीकडेच पंत आणि उर्वशी सोशल मीडियावर एकमेकांशी भिडले होते. पंतने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी टाकून उर्वशीचे नाव न घेता उर्वशीला फॉलो करणे थांबवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर उर्वशीने इंस्टाग्रामवर एक पोस्टही केली. यातही तिने पंतचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले होते.