
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. उर्फी विशेषतः तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी तसेच हॉट आणि बोल्ड लूकसाठी चर्चेत आहे. उर्फीला तिच्या कपड्यांमुळे अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. अर्धवट कपडे घालण्यामुळे उर्फीच्या विरोधात अनेकदा तक्रारीही करण्यात आल्या आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लिलता पसरवल्याच्या आरोपाखाली उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र तिच्यावर आतापर्यंत पोलिसांकडून कोणतीच कारवाई केलेली नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पोलीस स्थानकात जाऊन उर्फी जावेदला बेड्या घालण्याची देखील मागणी केली होती.
यावरुन गेल्या काही दिवसांपुर्वी चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात बरेच वादही झाले होते. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर निशाणा साधला होता, याला ही उर्फीने जोरदार प्रत्युत्तरही दिले होते. आता उर्फी जावेदने पु्न्हा एकदा चित्रा वाघ यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून खिल्ली उडवली आहे.
आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन चित्रा वाघ यांची खिल्ली उडवत उर्फीने एक ट्वीट केले आहे. उर्फी ट्वीटमध्ये म्हणते, “मेरी DP इतनी ढासू, चित्रा वाघ मेरी सासू” असं म्हटलं आहे.
Meri dp itni dhaasu, Chitra Meri saasu
— Uorfi (@uorfi_) January 9, 2023
अर्धवट कपडे घालण्यामुळे उर्फीच्या विरोधात अनेकदा तक्रारीही करण्यात आल्या आहेत. सगळे तिला विचारतात की ती पूर्ण कपडे का घालत नाही. आता उर्फीने या देखील प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तिला कमी कपडे घालणे का आवडते हे तिने सांगितले आहे. उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला होता या व्हिडिओमध्ये तिने अर्धवट घालण्याचे कारण सांगितले आहे. उर्फीने सांगितले आहे की मी लोकरीचे कपडे किंवा संपूर्ण कपडे घालते तेव्हा मला एलर्जी होते आणि ही एक मोठी समस्या आहे. मी पूर्ण कपडे का घालत नाही हे आता तुम्हाला कळले असेल. पुरावेही तुमच्यासमोर आहेत. माझ्या शरीराला कपड्याची ऍलर्जी आहे.