Urfii Javed: झेंडूच्या फुलांपासून उर्फीने बनवली बिकिनी; हॉट लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

WhatsApp Group

बिग बॉसमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद (Urfii Javed New Look) उर्फी जावेद नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. ती तिच्या आगळ्या वेगळ्या फॅशनने नेटकऱ्यांना नेहमीच आश्चर्याचा धक्का देत असते. नवनवीन कपडे, अफलातून लूकने ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करते. उर्फीचा नेहमीच आपल्याला एक निराळा अंदाज पहायला मिळतो. अशातच उर्फीचा आणखी एक नवा लूक व्हायरल होत आहे.

नेहमीच फॅशनच्या नावावर काहीतरी वेगळे करून लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारी उर्फी आज नव्या पेहराव्यात पहायला मिळाली. उर्फीने तिच्या नव्या लूकचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

या व्हिडीओमध्ये तीने झेंडूच्या फुलांची बिकीनी घातलेली दिसत आहे. उर्फी जावेद कॅमेऱ्यासमोर तिची नवीन बिकिनी स्टाईल दाखवताना दिसतेय. लुकबद्दल बोलायचे झाले तर, उर्फीने खुल्या केसांसह हलका मेकअप केला आहे.