
आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या उर्फी जावेदने एका वेगळ्या अंदाजात चाहत्यांना ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी साडीसोबत रिव्हिलिंग ब्लाउज घालून डान्स करत आहे.
या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद ईदच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यासोबतच तिने सर्वांना ईदच्या खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत. उर्फीची ही अनोखी स्टाइल सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये उर्फीने निळ्या रंगाची लाइट आणि डार्क कॉम्बिनेशनची साडी घातली आहे आणि ती फ्लॉंट करताना दिसत आहे. उर्फीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले- ‘या सुंदर गाण्याने तुम्हा सर्वांना ईद मुबारक.’उर्फीचा हा व्हिडिओ सध्या चांगलाचं चर्चेत आहे.