Urfi Javedनं मोबाईल आणि चार्जरपासून बनवला ड्रेस, पहा व्हिडिओ

WhatsApp Group

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिच्या असामान्य फॅशन सेन्समुळे आणि विधानांमुळे चर्चेत आलेली उर्फी जावेद तिच्या कामापेक्षा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे लोकांच्या नजरेत राहते. बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. उर्फीला अनेक वेळा पसंती दिली जाते, अनेकवेळा ती ट्रोलच्या निशाण्यावर येते.

उर्फी जावेद अनेक वेळा फुलं आणि पानांनी अंग झाकताना दिसली आहे. आत्तापर्यंत तिचे अनेक विचित्र पोशाख पाहिल्यानंतर, आता ती कोणता नवीन आणि सर्जनशील पोशाख घेऊन येईल याची तिचे चाहते वाट पाहत आहेत. आत्तापर्यंत तुम्ही उर्फीचे अनेक प्रकारचे कपडे पाहिले असतील, परंतु उर्फीने नुकताच शेअर केलेला व्हिडिओ तुम्ही पाहतच राहाल. उर्फीचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

उर्फी जावेदने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ताज्या व्हिडिओमध्ये, अभिनेत्री शाही निळ्या रंगाची पँट आणि ब्लेझरमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती टॉपलेस अवतारात दिसत आहे. क्लिपमध्ये उर्फीने तिचे शरीर दोन मोबाईलने झाकले आहे आणि चार्जसह बिकिनीचा पट्टा बनवला आहे. उर्फीने मधल्या भागात केसांचा बन बनवून तिचा लूक पूर्ण केला आहे. उर्फी व्हिडिओमध्ये चालताना दिसत आहे. त्याच्या इंस्टाग्रामवरून ही पोस्ट शेअर करत तिने – ‘फुल चार्ज्ड’. असं लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. सुशील नावाच्या युजरने लिहिले की, ‘उर्फी आता देशाबाहेर फेकले पाहिजे.’ एका यूजरने लिहिले की, ‘माझा फोनही चार्ज कर, उर्फी दीदी.’