‘राष्ट्रध्वज फडकवताना सेल्फी अपलोड करा’, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष आवाहन

0
WhatsApp Group

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेअंतर्गत नागरिकांना harghartiranga.com या संकेतस्थळावर तिरंगा ध्‍वजासोबतचे आपले छायाचित्र  अपलोड करण्याचे आवाहन केले आहे.

ते ट्वीटमध्ये म्हणाले, “हर घर तिरंगा अभियानामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्‍ये एक नवीन चैतन्य, ऊर्जा भरली गेली आहे. देशवासियांनो,  यावर्षी हे अभियान एका नवीन उंचीवर घेऊन जायचे आहे. चला तर मग, 13 ते 15ऑगस्‍ट या कालावधीमध्‍ये देशाचा ‘मान, सन्मान आणि अभिमान’यांचे प्रतीक असलेला राष्‍ट्रीय ध्‍वज घरोघरी फडकविण्‍यात यावा. तिरंगा ध्‍वजाबरोबर सेल्फी काढून तो harghartiranga.com या संकेतस्थळावर  सर्वांनी जरूर अपलोड करावा.”