पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात Savitribai Phule Pune University साकारण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले Savitribai Phule Statue यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता अनावरण करण्यात येणार आहे.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार Sharad Pawar, उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnvis, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ Chagan bhujbal, राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत Uday Sawant यांच्यासह इतर प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.