राज्यात अनेक भागात उन्हाच्या झळा जाणवत आहेत. सकाळी कडक ऊन आणि रात्री गारवा या विचित्र वातावरणामुळे अनेकजण आजारी पडत असताना आता हवामान खात्याकडून 7 मार्चपासून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संध्याकाळच्या वेळेत पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा आणि सोबत वीजेचा कडकडाट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
3 March, IMD Weather Updates:
05 ते 07 मार्च दरम्यान उत्तर महाराष्ट्र, दक्षिण मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढगाळ आकाश काही भागात.
IMD GFS मोडेल मार्गदर्शन 5-8 March खाली. pic.twitter.com/1yWAYgSTNN— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 3, 2023