केंद्रीय मंत्री नारायण राणेंना हायकोर्टाचा दणका; ‘अधीश’ बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश

WhatsApp Group

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दणका मिळाला आहे. नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. त्याशिवाय, राणे यांना हायकोर्टाकडून 10 लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. सीआरझेड कायदा आणि एफएसआयचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

मार्च महिन्यात आलेल्या नोटिसीप्रमाणे अधीश बंगल्यातील बेकायदेशीर बांधकाम नारायण राणे यांनी जमीन दोस्त करावं. त्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती. पण जर नारायण राणेंनी बांधकाम पाडलं नाही, तर बीएमसीकडून बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यात येईल. आणि त्यासाठी येणारा खर्चही नारायण राणेंकडून वसूल केला जाईल, असं पालिकेकडून सांगण्यात आलं होतं.

दरम्यान, पालिकेच्या नोटिसीला उत्तर देताना नारायण राणेंचे सुपुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी मातोश्रीवर हल्लाबोल केला होता. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यातील अवैध बांधकामाकडे पालिका दुर्लक्ष करत आहे आणि ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना टार्गेट केलं जातं, असा आरोप नितेश राणे यांच्याकडून करण्यात आला होता.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा