शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली. त्यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे मोठ विधान केलं या विधानमुळे ठाकरेंची डोकेदुखी आणखीनच वाढणार आहे. शिवसेना आता पूर्णपणे संपलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेले सहा ते सात आमदार तेही ऑन दी वे आहेत. ते कोणत्याही वेळी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असं विधान नारायण राणे यांनी केलं आहे. राणे यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या गटातील कोणते आमदार भाजपमध्ये येणार याची चर्चा रंगली आहे.
जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटकेला स्थगिती
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माध्यमांसोबत बोलताना ही विधान केलं आहे. उद्धव ठाकरे यांचं राजकारण फक्त आणि फक्त मातोश्रीमध्येच आहे. त्यामुळे मी काही बोलणार नाही. शिवसेना कुठे राहिली आहे? शिवसेना आता संपली आहे. 56 वरून 6-7 आमदार उरले आहेत. तेही वाटेवर आहेत. ऑन दी वे आहेत. ते कधीपण भाजपमध्ये प्रवेश करतील.