केंद्रीय मंत्री नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल

WhatsApp Group

मुंबई – केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे रुग्णालयात दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नारायण राणे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. नारायण राणे यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. त्यांना दोन दिवस विश्रांतीसाठी रुग्णालयामध्ये ठेवलं जाऊ शकतं.

मिळालेल्या माहितीनुसार, नारायण राणे नियमित तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात आले होते. यावेळी अँजिओग्राफी करण्यात आली असता काही ब्लॉक आढळले. यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. नारायण राणे यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना दोन दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.