गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे (Corona) सर्व निर्बंध मागे घेण्यात आले होते. तब्बल दोन वर्षांपासून असलेली मास्क सक्ती हटवण्यात आली. नागरिकांनीही मोकळा श्वास घेतला आहे. पण आता पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोक वर काढले आहे.
#COVID19 | Union Health Secretary Rajesh Bhushan writes to Haryana, Uttar Pradesh, Delhi, Maharashtra, and Mizoram on the increasing positivity rate and cases pic.twitter.com/vHqZUCObi4
— ANI (@ANI) April 19, 2022
चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारकडून पाच राज्यांना पंचसुत्रीचे पालन करण्यासाठी पत्र आले आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, मिझोराम या राज्यांचा समावेश आहे. या पाच राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या ५ राज्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि योग्य त्या उपाययोजनेसाठी पावलं उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.