नाशिक – नाशिकच्या (Nashik) बंदावणे मळा परिसरामध्ये राहणाऱ्या भिकाजयसिंग यांचा लहान मुलगा श्रीरीश हा सकाळी उठल्यानंतर रागंत-रागंत घरातील खोलीमध्ये असलेल्या बाथरुममध्ये गेला. यावेळी घराती मंडळी त्या रुममध्ये नव्हते. हा चिमुकला रांगत बाथरुमध्ये गेला आणि अपघाताने प्लास्टिकच्या बादलीतील पाण्यामध्ये पडला.
काही वेळाने घरातील लोकांना हा सर्व प्रकार समजला असता त्यांनी अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या श्रीरिशला त्वरीत रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या चिमुकल्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेमुळे संपुर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरातही हळहळ व्यक्त करण्याय येत आहे. यावरुन मुल जेवढं लहान तेवढी जाबाबदारी मोठी याची प्रचिती होते. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.