मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने शुक्रवारी (15 डिसेंबर) एक अतिशय आश्चर्यकारक निर्णय घेतला. मुंबई संघाने पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला नवा कर्णधार बनवले. मुंबई संघाच्या या निर्णयामुळे चाहते नाराज झाले आणि त्यांनी आपापल्या पद्धतीने संघाला विरोध करण्यास सुरुवात केली. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयावर नाराज झालेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मुंबईला अनफॉलो करण्यास सुरुवात केली.
काही वेळातच मुंबई इंडियन्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचे फॉलोअर्स कमी होतं आहेत. मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्समध्ये अचानक घट झाल्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की चाहत्यांना त्यांचा निर्णय अजिबात आवडला नाही. रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे, पण तरीही त्याला कर्णधारपदावरून काढून संघाची कमान हार्दिककडे सोपवणे खरोखरच धक्कादायक आहे.
हेही वाचा – ‘‘ज्याने शिकवलं त्याच्याच पाठीत वार केलास”, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर चाहते संतापले
रोहितने मुंबईला पाचवेळा चॅम्पियन बनवले
रोहित शर्माने आपल्या कर्णधारपदाखाली मुंबई इंडियन्सला पाचवेळा चॅम्पियन बनवले आहे, हे कुणापासून लपून राहिलेले नाही. हिटमॅनने 2013 पासून मुंबईची जबाबदारी सांभाळण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्याने आपल्या नेतृत्वाखाली मुंबईला पाच आयपीएल विजेतेपद मिळवून दिले. मुंबई इंडियन्स हा पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणारा सर्वात पहिला आणि पहिला संघ होता. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल चषक जिंकला.
View this post on Instagram
हार्दिकचा आयपीएल प्रवास
हार्दिक पांड्याने 2015 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि 2021 पर्यंत तो संघासाठी खेळला. पण 2022 मध्ये तो नव्याने स्थापन झालेल्या गुजरात टायटन्स या फ्रँचायझीचा भाग बनला. हार्दिकने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला पहिल्याच सत्रात चॅम्पियन बनवले होते. त्यानंतर पुढच्या हंगामात म्हणजेच IPL 2023 मध्ये गुजरात संघाने हार्दिकच्या नेतृत्वाखाली स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पण त्यानंतर 2024 च्या आधी, हार्दिक अचानक मुंबई इंडियन्सच्या जुन्या फ्रेंचायझीमध्ये परतला आणि आता तो संघाचा कर्णधारही बनला.