Dawood Ibrahim पाकिस्तानातच, हसिना पारकरचा मुलगा अलीशाहने ED समोर दिली कबुली

WhatsApp Group

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत (Underworld don Dawood Ibrahim) मोठा खुलासा झाला आहे. दाऊद इब्राहिमच्या पुतण्याने यावेळी दाऊद इब्राहिम कुठे आहे याची मोठी माहिती दिली आहे. दाऊदचा पुतण्या अलीशाह पारकरने ईडीला सांगितले की, दाऊद सध्या पाकिस्तानातील कराचीमध्ये राहत आहे.

अलीशाने चौकशीत ईडीला आणखी अनेक महत्त्वाची माहिती दिली आहे. अलीशाहने सांगितले की, त्याचे कुटुंब आणि तो सध्या दाऊदच्या संपर्कात नाहीय. दाऊदची पत्नी मेहजबीन सणासुदीच्या वेळी त्याच्याशी संपर्क साधते अशीही माहिती समोर आली आहे. ईडीचे अधिकारी मनी लाँड्रिंग प्रकरणात अलीशाची चौकशी करत आहेत.