नवी दिल्ली – रणजी ट्रॉफीची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. दिल्लीच्या संघानेही बुधवारी आपला संघ जाहीर केला आहे. 19 वर्षांखालील विश्वविजेत्या भारतीय संघाचा कर्णधार यश धुललाही Yash Dhull या संघात स्थान मिळाले आहे. यश धुल पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी ranji trophy खेळताना दिसणार आहे.
ना धोनी, ना रोहित ना कोहली…IPL च्या इतिहासात ‘या’ खेळाडूवर लागली होती पहिली बोली
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात (IND vs WI) खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या सामन्यात बुधवारी अहमदाबादमध्ये यश धुलचा गौरव करण्यात आला. अंडर-19 विश्वचषक जिंकणारा संपूर्ण संघ अहमदाबादला पोहोचला जिथे बीसीसीआय आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनने संपूर्ण संघाचा गौरव केला.
— DDCA (@delhi_cricket) February 9, 2022
कर्णधार म्हणून खेळताना धुलने अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये 4 मॅचमध्ये 76 च्या सरासरीने 229 धावा केल्या होत्या. यश धुलला आयपीएलमध्येही चांगले पैसे मिळू शकतात. रणजी ट्रॉफीचा पहिला टप्पा १७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. दिल्ली संघानेही याची घोषणा केली आहे.
IPL 2022: सनरायझर्स हैदराबाद दिसणार नव्या ढंगात, पाहा संघाची नवी जर्सी
दिल्लीचा संघ पुढीलप्रमाणे Delhi Ranji team – प्रदीप सांगवान, नितीश राणा, नवदीप सैनी, ध्रुव शौरी, प्रियांश आर्य, यश धुल, क्षितिज शर्मा, डोन्टी सिद्धू, हिम्मत सिंग, ललित यादव, अनुज रावत, लक्ष्य थरेजा, सिमरजीत सिंग, मयंक यादव, कुलदीप यादव, विकास मिश्रा, शिवांग वशिष्ठ आणि शिवम शर्मा.