IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी उमेश यादव, श्रेयस अय्यर आणि शाहबाज अहमदला संधी

WhatsApp Group

India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून (बुधवार) टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी उमेश यादव, श्रेयस अय्यर आणि शाहबाज अहमद हे भारतीय संघात सामील झाले आहेत. अष्टपैलू दीपक हुडा दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांनाही संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे.

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि शाहबाज अहमद तसेच श्रेयस अय्यरला संधी दिली आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुडा दुखापतीमुळे बाहेर आहे. तो एनसीएमध्ये आहे. त्याचबरोबर अर्शदीप सिंगही या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये सामील झाला आहे. मोहम्मद शमी कोरोना व्हायरसमुळे संघातून बाहेर आहे. शमीच्या जागी उमेशला संधी देण्यात आली आहे. तर हुडाच्या जागी श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यात आलं आहे.

भारताचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग , हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद.