
शिवसेनेतील बंडखोरीमुळे मुख्यमंत्रीपद गमवावे लागलेले उद्धव ठाकरे यांचे आता पक्षप्रमुखपदही धोक्यात आले आहे. त्यांचा शिवसेना अध्यक्षपदाचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपत आहे. शिवसेनेला ताब्यात घेण्यासाठी उद्धव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात लढाई सुरू आहे. दोन्ही गट खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहेत. शुक्रवारी निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीदरम्यान उद्धव गटाच्या वकिलांनी पक्षांतर्गत निवडणुका घ्याव्यात किंवा स्थिती कायम ठेवावी, अशी विनंती केली होती, मात्र आयोगाने त्यावर मौन बाळगले आहे.
आयोगाने दोन्ही गटांना 30 जानेवारीपर्यंत लेखी युक्तिवाद करण्यास सांगितले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 2013 आणि 2018 मध्ये उद्धव शिवसेना पक्षप्रमुख झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख नसल्याचा युक्तिवाद शिंदे गटाने निवडणूक आयोगात केला आहे.