नव्या सरकारच्या स्थापनेनंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

WhatsApp Group

मुंबई – शिवसेनेते बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळेच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी नव्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा! असं ट्वीट उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.