‘धनुष्यबाण चिन्ह गोठवलं हे समजल्यावर उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात पाणी आलं’

WhatsApp Group

राज्यात गेल्या 3-4 महिन्यापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यात शनिवारी एक महत्त्वाची घटना घडली. अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोनही गटांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही असा निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला. धनुष्यबाण चिन्ह गोठवलं याचा सर्वात मोठा धक्का हा उद्धव ठाकरे यांना बसला आहे.

शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या महाप्रबोधन यात्रेला सुरुवात झाली यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, ‘बाळासाहेब ज्या देव्हारातील देवांची पूजा करायचे त्या देव्हाऱ्यात धनुष्यबाण ठेवले होते, त्याची पूजा देखील बाळासाहेब करत असे, ते चिन्ह गोठवलं आणि हे सांगताना उद्धव ठाकरे यांचा बांध फुटला. ज्या चिन्हावर तुम्ही मंत्री झालात, निवडून आला, तेच चिन्ह तुम्ही गोठवलं. आज उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात पाणी आले, असं म्हणत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.