
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारी एकापाठोपाठ एक पक्ष सोडून जात असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. कारण ठाकरे घराण्याचा वारसदार असणारे निहार ठाकरे (Nihar Thackeray) हे शिंदे गटात सामील झाले आहेत.
निहार ठाकरे यांनी शुक्रवारी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. एवढेच नव्हे तर निहार ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आता राजकारणामध्येही प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे घराण्यातील आणखी एका व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील राजकीय समीकरणे कितपत बदलणार, हे पाहावे लागणार.