‘आज मी माझ्या राजीनामाचं पत्र तयार करून ठेवतो…’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच आव्हान

WhatsApp Group

मुंबई – शिवसेनेतील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार अल्पमतामध्ये आल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी जनतेशी भावनिक साद घातली.

समोर येऊन माझ्याशी संवाद साधा. आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तुमच्यासमोर ठेवतो. संध्याकाळी बंडखोरी केलेल्या आमदारांनी यावं. मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही. मुख्यमंत्रिपद हे अनपेक्षितपणानं माझ्याकडे आलं. तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको हे माझ्यासमोर येऊन सांगा. मी पद सोडून देईन. हे माझं नाटक नाही. संख्याबळ हा माझ्यासाठी गौण आहे.

ते पुढे म्हणाले की, माझी पहिली कॅबिनेट मीटिंग हॉस्पिटलमध्ये ऑनलाइन केली होती. शिवसेना आणि हिंदुत्व हे दोन एकमेकांमध्ये गुंतलेले शब्द आहेत. शिवसेना कदापि हिंदू आणि हिंदूत्व कदापि शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही आणि शिवसेनाप्रमुखांनी दिलेला कानमंत्र आहे. हिंदुत्व आमचा श्वास आहे, म्हणूनच पंधरा दिवसांपूर्वी आदित्य, एकनाथ शिंदे अयोध्येला गेले. हिंदुत्वाबद्दल मी विधानसभेमध्ये विधिमंडळात बोलणारा कदाचित पहिल्या मुख्यमंत्री असेन.

मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, गुवाहटीला गेलेल्या आमदारांनी येऊन माझा राजीनामा घेऊन राजभवनात द्या. मला कोरोना झाला आहे म्हणून मी राजभवनात जाऊ शकत नाही, असंही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.