तुम्ही कसले मर्द, तुम्ही तर माझे वडीलही चोरायला निघालात; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

WhatsApp Group

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईच्या काळाचौकी येथील शिवसेना शाखेचं मोठ्या जल्लोषात उद्घाटन झालं. यावेळी उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली.  तुम्ही कसले मर्द, तुम्ही वडील चोरायला निघालेत, तुम्ही दरोडेखोर आहात, अशा खोचक शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी टीका केली. तसेच निवडणुकीच्य प्रचाराला शिवसेना प्रमुख म्हणजे माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव न घेता आपल्या आई-वडिलांच्या नावाने मतं मागा, असंदेखील आव्हान उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना दिलं.

ज्यांना आम्ही शेंदूर लावला, आता तेच शिवसेना गिळायला निघाले आहेत. त्यांना भाजपची साथ आहे, भाजपला अंदाज नाही, कोणत्या शक्तीसोबत पंगा घेतला आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपला ठाकरे आणि शिवसेना हे नातं संपवाचं आहे. याआधी अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला पण आता शिवसेना संपवण्याचा डाव आखलाय, असेही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

किती वादळ येऊदे शिवसेनेची पाळं मुळं घट्ट आहे आहेत.  जे गेले त्यांचं कोणत्या भाषेत वर्णन करायचं. अन् काल त्यांनी आम्हाला गद्दार बोलू नका अशी विनंती केली. हे आम्ही नाही, त्यांनी त्यांच्या कपाळावर टिक्का लावून घेतलाय. जे गेले आहेत, त्यांच्या बरोबर एकही शिवसैनिक गेला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अजय चौधरी यांना विधइमंडळाचे गटनेता केले आहे, अअसंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.