Video: ”देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा”, भरसभेत ठाकरेंनी ऐकवली देवेंद्र फडणवीसांची ती ऑडिओ क्लिप

चिखली येथे उद्धव ठाकरे यांचा शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मेळाव्याला संबोधित करताना ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर चौफेर टीका केली. यावेळी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यावरुन उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडीओ प्ले करुन त्यांना जनाची नाही तरी मनाची लाज बाळगा असं. यावेळी त्यांनी शिंदे गटावर तर सडकून टीका केली.