भाजपला आता समजलंय मुंबईमध्ये बाळासाहेबांचं नाव चालतं मोदींचं नाही; उद्धव ठाकरे

WhatsApp Group

मुंबई : बुलेट ट्रेन हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं का? आरेची वाट लावून कारशेड उभारणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं का? मुंबईमध्ये बाळासाहेबांचं नाव चालतं मोदींचं नाव चालत नाही. हे तुम्हाला आता कळलं आहे. असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. ते मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचा सुवर्ण महोत्सव काल षण्मुखानंद सभागृहात पार पडला यावेळी बोलत होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ‘दिल्ली मिळाली आता यांचा डोळा आमच्या मुंबईवर आहे. विधान भवनात एक घोषणा करण्यात आली ’50 खोके एकदम ओके’ हे तुम्ही सुद्धा आता बोलताय मी बोलत नाही लोकांना सर्वकाही आता माहिती झालं आहे.

आमच्या सरकारला तीन चाकी म्हटलं जात होतं, आता यांचं सरकार तर दोन चाकी आहे. हे ईडी सरकार किती काळ चालेल माहित नाही, यांचा जन्मच खोक्यांपासून झाला आहे. तर जनता यांच्यावर विश्वास कशी ठेवणार? सरकार पुढे चालू शकणार नाही असं उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.