कोकणचे सुपूत्र Uday Lalit आज घेणार भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ

WhatsApp Group

Uday Lalit आज भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ  घेणार आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये लळीत यांना  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  शपथबद्ध करणार आहेत. लळीत  यांचा कालावधी 3 महिन्यांचा आहे. त्यानंतर ते निवृत्त होतील.

महाराष्ट्रातील दुसरे आणि सर्वोच्च न्यायालयाचे ते 49 वे सरन्यायाधीश असणार आहेत. अडीच महिन्यांचा त्यांचा कार्यकाळ राहणार आहे. असे असले तरी महाराष्ट्रातील महत्वाचे एकनाथ शिंदे-ठाकरे शिवसेना वादाचे प्रकरणाची मुख्य जबाबदारी त्यांना हाताळावी लागणार आहे. लळीत यांच्यानंतर 50 वे सरन्यायाधीश म्हणून न्या. डी वाय चंद्रचूड हे शपथ घेतील.