बॉलिवूड स्टार शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात घुसले दोन तरुण, पोलिसांना सांगितले कारण

WhatsApp Group

मुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या बंगल्यात घुसल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी गुरुवारी गुजरातमधील दोन तरुणांना ताब्यात घेतले. वांद्रे पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 19-20 वर्षे वयोगटातील दोन तरुणांना ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बंगल्यात प्रवेश करताना पकडले.

चौकशीदरम्यान दोघांनी पोलिसांना सांगितले की, आपण गुजरातमधून आलो आहोत आणि त्यांना शाहरुखला भेटायचे आहे. परवानगीशिवाय परिसरात प्रवेश करणे यासह भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांखाली गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

गुरुवारी घडलेल्या या घटनेत शाहरुख खानच्या घरी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दोघांनाही पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. वांद्रे पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंवि 452, 34 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. दोघेही गुजरातमधील सुरतचे रहिवासी असून शाहरुख खानचे चाहते असल्याचे सांगण्यात येत आहे.