टोल भरण्यावरून तुफान राडा: टोलनाक्यावर दोन महिला समोरासमोर भिडल्या; VIDEO व्हायरल

WhatsApp Group

नाशिक : टोलनाक्यावर टोल भरण्यावरून होणारे वाद काही नवीन नाहीत. नाशिकमधील पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरही बुधवारी सायंकाळी टोल भरण्याच्या किरकोळ कारणातून दोन महिला भिडल्याची घटना समोर आली आहे. टोलनाक्यावरील महिला कर्मचारी आणि सीआरपीएफ पोलीस पत्नी यांच्यात टोल भरण्यावरून हाणामारीचा प्रकार घडला. पिंपळगाव पोलिसांनी रात्री उशिरा केलेल्या मध्यस्थी व माफीनाम्यानंतर या वादावर पडदा पडला आहे.

या हाणामारीचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे पिंपळगाव टोलनाका मात्र हाणामारीसाठीच प्रसिद्ध झाल्याचे या घटनेवरून आता दिसून येत आहे.

दरम्यान येथे बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती. त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र या दोघींनी एकमेकींचे केस इतके घट्ट पकडून ठेवले होते की दोघींनाही आवरता येत नव्हते. शेवटी दोघा तिघांनी मिळून या महिलांना बाजूला केले. दरम्यान या तुफान राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.