Viral Video: दोन चाकी बाईकची बनवली ‘चार सीटर’ गाडी, बाईकचं मॉडिफिकेशन पाहून नेटकरी थक्क

WhatsApp Group

जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आतापर्यंत सर्व प्रकारचे बाईक मॉडिफिकेशन (Bike Modification) पाहिले आहेत, तर हा व्हिडिओ तुमचा विचार नक्कीच बदलेल. सोशल मीडियावर सध्या एका अशा अनोख्या बाईकचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जिचा पुढचा लूक पाहून नेटकऱ्यांची मती गुंग झाली आहे. “हे नक्की काय पाहिलं भाई?”, अशा प्रतिक्रिया देत युजर्स याला ‘मॉडिफिकेशनचा बाप’ म्हणत आहेत.

समोरून येताच उडतोय गोंधळ

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओच्या सुरुवातीला एक बाईक रस्त्यावरून सामान्य वेगाने धावताना दिसते. बाजूने (Side view) पाहिल्यास ही बाईक अगदी साधी आणि सामान्य वाटते. मात्र, कॅमेरा जसा बाईकच्या समोरच्या बाजूला येतो, तसा पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. खरं तर, या बाईकचा पुढचा भाग ऑईल टँकपासून पूर्णपणे वेगळा करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prashant Dubey (@iprashant._)

दोन नाही, आता ‘चार’ सीटची मजा

या बाईकला एका बाजूला ‘टिर्री’ किंवा छोट्या रिक्षाच्या आकाराचा एक रुंद सेटअप जोडण्यात आला आहे. या भन्नाट देसी जुगाडामुळे (Desi Jugaad) ही बाईक आता दोन नव्हे, तर चक्क चार सीटची झाली आहे. गाडीला रस्त्यावर व्यवस्थित तोल सांभाळता यावा, यासाठी मागे एक अतिरिक्त चाकही लावण्यात आले आहे. दुरून पाहताना चालकाचे पाय कुठे आहेत आणि गाडी नेमकी कशी चालतेय, याचा अंदाज बांधणे कठीण होते.

६ कोटींहून अधिक व्ह्यूज

इन्स्टाग्रामवर @iprashant._ नावाच्या अकाऊंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ६.६ कोटींहून अधिक व्ह्यूज आणि १८ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडत असून एका युजरने म्हटले की, “आधी मला वाटलं चालकाचे पायच नाहीत, पण हे तर खतरनाक मॉडिफिकेशन निघालं!” दुसऱ्या एकाने लिहिले की, “हे तर ऑप्टिकल इल्यूजनचं प्रो मॅक्स लेव्हल आहे.”