Jammu And Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

WhatsApp Group

Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला कुपवाडा (Kupwara) येथे मोठे यश मिळाले आहे. येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. लष्कर-ए-तोयबा (LeT) या प्रतिबंधित दहशतवादी (Terrorists) संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये पाकिस्तानी दहशतवादी (Pakistani Terrorist) तुफैलचा (Tufail) समावेश आहे. काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार (IGP Vijay Kumar) यांनी सांगितले की, चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून, त्यापैकी एक पाकिस्तानी दहशतवादी तुफैलचाही समावेश आहे.

कुपवाडा येथील चकतारस कंदी येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने नाकाबंदी सुरू केली. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिले. या भागात अजूनही दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.