
रत्नागिरी : गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातामध्ये 25 ते 30 प्रवासी जखमी झालं असल्याचं समजत आहे. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. चिपळूण धोपावे बस आणि गुहागर डेपोची बस अवघड वळणावर समोरासमोर धडकल्या आहेत.
बसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी RGPPL च्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, घटनास्थळी सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. गुहागर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरु आहे.