औरंगाबादमध्ये विहिरीत बुडून सख्ख्या बहिणींचा मृत्यू

WhatsApp Group

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. शेतांमध्ये गेलेल्या या दोन बहिणी गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता होत्या. सोमवारी दुपारी 2 च्या सुमारास शेतातील विहिरीमद्धे त्यांचा मृतदेह आढळून आला. स्वाती दत्तू चव्हाण (वय 19) व शितल दत्तू चव्हाण (वय 5) असे मृत मुलींचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी 14 जानेवारीला दुपारी 2 वाजता विहिरीच्या बाजूला असलेले गवत काढण्यासाठी या दोन बहिणी  शेतामध्ये गेल्या होत्या. मात्र संध्याकाळ झाली तरी त्या घरी आल्या नाही. त्यामुळे नातेवाईकांकडून शोधाशोध सुरू झाली.  मात्र त्या दोघी कुठेही आढळून आल्या नाही. शेतात आणि गावात सर्वत्र शोध घेतल्यानंतरही दोन्ही मुली सापडल्या नाही. त्यानंतर मुलींचे वडील दत्तू बाबुराव चव्हाण यांनी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांकडून मुलींचा शोध घेणे सुरूच होते. सोमवारी शेतातील जुन्या पडक्या विहिरीमध्ये स्वाती आणि शितल यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले.