Norovirus : कोरोनामध्ये नवं संकट, केरळात आढळले नोरोव्हायरसचे दोन रुग्ण

WhatsApp Group

Norovirus : देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यातच आणखी एक संकट येण्याची शक्यता आहे. केरळमध्ये नोरोव्हायरस या रोगाचे दोन रुग्ण आढळले आहेत. तिरुवनंतपुरमधील विझिंजममधील एका शाळेतील दोन मुलांना नोरोव्हायरस विषाणूची लागण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डायरिया आणि उल्टी झाल्यामुळे येथील 42 विद्यार्थ्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे नमुणे तपासले असता दोन जणांचा नोरोव्हायरस रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समोर आलेय. नोरोव्हायरसची लागण झालेले विद्यार्थी उचकाडा येथील एलएमएलपी शाळेत शिक्षण घेतात.

नोरोव्हायरस काय आहे?

नोरोव्हायरस हा एक संसर्गजन्य आजार आहे. नोरोव्हायरसमुळे उल्टी आणि डायरियाचा त्रास उद्भवतो. त्याला सामन्यपणे ‘विंटर वॉमिटिंग बग’ असं म्हटले जाते. CDC नुसार, नोरोव्हायरस सर्व वयाच्या लोकांना होऊ शकतो. इन्फ्लुएंजा व्हायरसमुळे हा आजर पसरतो.