धक्कादायक! चुकीच्या डोसमुळे दोन महिन्याच्या बालिकेचा मृत्यू

WhatsApp Group

वाशिम – एक धक्कादायक आणि चीड आणणारी बातमी समोर आली आहे. आरोग्य विभागाचा हलर्गजीपणामुळे एका लहान मुलीला प्राण गमवावे लागले आहेत. वाशिममध्ये चुकीचा पोलिओ डोस पाजल्यामुळे दोन महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप बालिकेच्या पालकांनी केला आहे.

वाशिममधील मंगरूळपीर तालुक्यामधील निम्बी गावामध्ये 8 फेब्रुवारीला बालिकेला डोस दिल्यानंतर मेंदूचे काम करणे बंद झाले. त्यानंतर तात्काळ वाशिममधील एका खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान त्या बालिकेचा मृत्यू झाला. डोक्यात ताप शिरल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.