राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. नागपूर शहरामध्ये झालेल्या तुफानी पावसामुळे भिंत कोसळली. या ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गोंडवाना चौक जीपी हाइट्स भागात ही घटना घडली.
पावसामुळे नागपूर शहरात रात्री शहरातल्या अनेक वस्त्या अंधारात बुडाल्या होत्या. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. नागपुरात रात्री झालेल्या झालेल्या अवकाळी पावसामुले भिंत कोसळून मायलेकाचा मृत्यू झाला. ढिगाराखाली दबून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.