गणपती विसर्जन मिरवणुकीत टेम्पो शिरला, दोघांचा मृत्यू तर १५ जण जखमी

WhatsApp Group

कोकणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भरधाव टेम्पो थेट विसर्जन मिरवणुकीत शिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव टेम्पो विसर्जन मिरवणुकीत शिरल्याने एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे ही दुर्घटना घडली आहे. गणपती विसर्जनाची मिरवणूक निघाली असतानाच एक भरधाव टेम्पो मिरवणुकीत शिरला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पोचा ब्रेक फेल झाला होता आणि त्यामुळेच भरधाव टेम्पो गणपती विसर्जन मिरवणुकीत शिरला. गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर या ठिकाणी ही घटना घडली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जखमींपैकी दोघांचा मृत्यू झाला.

 

गणपती विसर्जन मिरवणूक काढत वाजत-गाजत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे. मुंबईतील विविध समुद्र किनाऱ्यांवर गणपती विसर्जन सुरू असतानाच सायंकाळच्या सुमारास मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला. मुसळधार पावसासोबतच विजांचा कडकडाट झाला आणि जुहू येथे वीज कोसळली. गणपती विसर्जनासाठी जुहू समुद्र किनाऱ्यावर उपस्थित असलेला स्वयंसेवक वीज कोसळून जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी या स्वयंसेवकाला मृत घोषित केले.