मुंबई – गोवा महामार्गावर दोन अपघात भीषण अपघात (two accidents on Mumbai – Goa Highway) झाले आहेत. या दोन अपघातामध्ये एकूण 37 प्रवासी जखमी (37 passengers injured) झाले आहेत. त्यातील 15 प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. पहिला अपघात लक्झरी बसला भरणे गोवळवाडी येथे झाला आहे. तर दुसरा अपघात हा तवेरा गाडीचा झाला आहे.
परळ (Parel Mumbai)हून खेड तालुक्यामधील (Khed Taluka) केळणे या गावामध्ये लग्नासाठी जात असताना खासगी आराम बसला अपघात झाला आहे. भरणे गोवळवाडी या ठिकाणी महामार्गाच्या कडेला खड्ड्यात जाऊन पलटली तर मुंबईहून जयगडला जाणाऱ्या तवेरा गाडीचा देखील भरणे वळंज वाडी या ठिकाणी अशाच प्रकारे महामार्गलगत खड्ड्यात पडून भीषण अपघात झाला आहे.
या दोन्ही अपघातामध्ये 37 प्रवासी जखमी झाले असून, त्यामध्ये पंधराहून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही अपघात हे सकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या दरम्यान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. तसेच खेडमधील मदत ग्रुप आणि रेस्क्यू टीमचे जवान देखील घटनास्थळी मदतीला दाखल झाले. दोन्ही अपघातांमधील सर्व जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे