अमरावतीमध्ये झेंडा लावण्यावरुन दोन गटात तूफान राडा, पोलिसांवरही दगडफेक

WhatsApp Group

अमरावती – अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे झेंडा लावण्यावरुन दोन गटात वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर तुफान राडा पाहायला मिळाला. दोन गटातील वादाचे रुपांतर दगडफेकीत झाले. दगडफेकीनंतर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तर अचलपूर, परतवाडा शहरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

अमरावतीच्या अचलपूर शहरामध्ये दुल्हा गेटवर झेंडा लावण्यावरून दोन गटात वाद झाला. या वादानंतर शहरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे आता अचलपूर आणि परतवाडा शहरामध्ये 144 कलम लागू करण्यात आले आहे. आता जमावबंदी असल्यामुळे गटाने फिरण्यावर बंदी असणार आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाआहे. संतप्त जमावाकडून पोलिसांच्या दिशेनंही दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी असल्याची माहिती आहे.