शेतातील तळ्यात पडलेल्या दीड वर्षांच्या मुलाला वाचविण्यासाठी त्याच्या वडिलांनी पाण्यात उडी टाकली. मात्र, त्यांना पोहता येत नसल्यामुळे या बापलेकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बुडणाऱ्या पती व मुलाला वाचविण्यासाठी शेततळ्यात उडी घेतलेल्या महिलेच्या आवाजामुळे जवळच्या परिसरातील लोक मदतीला धावले.
त्यामुळे महिलेचा जीव वाचवण्यात यश आलं. जांबूत जवळील पंचतळे परिसरामध्ये रविवारी साडेपाचच्या दरम्यान ही घटना घडली.