उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यामध्ये एका तरुणीच्या प्रेमविवाहाच्या रागातून तिच्या भावांनी तिची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलीचे आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध १८ महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते. या रागात तिच्या भावांनी गोळ्या झाडून तिची हत्या केली. आरोप फरार झाले सून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
उत्तर प्रदेशातील बदाऊन जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी एका तरुणीने प्रेमविवाह केला होता. याचा तिच्या भावांना खूप संतापला आला होता. बहिणीच्या प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या भावांनी 21 वर्षीय तरुणीची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरमाई गावामध्ये मोअज्जम आणि मुजीम यांनी त्यांच्या बहिणीवर गोळ्या झाडल्या आहेत. मुलीच्या भावांनी मुलीला तिचा पती फहीमसोबत पाहिल्यानंतर ते संतापले. पोलिसांकडून सांगण्यात आले आहे की, मुलीने 18 महिन्यांपूर्वी फहीम नावाच्या एका तरुणाशी तिच्या पालकांच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं होतं. त्यामुळे तिचे भाऊ या गोष्टीवरुन खूप संतापले होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी तिच्या पतीसोबत औषध घेण्यासाठी तिच्या गावावरून बदाऊनला गेली होती. यानंतर ती बाजारातून घरी परतत असताना तिच्या भावांनी तिला पाहिले. यानंतर तरुणीच्या भावांनी तिच्यावर मागून गोळीबार केला. यात त्या मुलीचा जागीच मृत्यू झाला.