कोकणातलं राजकीय वातावरण तापलं, दोन बडे नेते ईडीच्या रडारवर?

WhatsApp Group

रत्नागिरी – कोकणात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबद्दल असलेले समर्थक आणि विरोधक अशा दोन मतप्रवाहांमुळे वातावरण चांगलेचं तापले आहे. त्यातच या परिसरामधील व्यवहारावर ईडीचे संपूर्ण लक्ष आहे. जिल्ह्यामध्ये वाढत्या राष्ट्रवादीच्या हस्तक्षेपामुळे शिवसेनेचे जुने जाणते पण वजनदार नेते अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात योग्य ती तडजोड न झाल्यास राजकीय भूकंप होऊ शकतो अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुंबई-ठाणे येथील कारवाईनंतर कोकणामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यातील दोन वजनदार नेते ईडीच्या रडावर असल्याची चर्चा रंगली आहे. यामध्ये कितपट तथ्य आहे किंवा कसे ? या सगळ्याबाबत ईडीकडे जिल्ह्यातील विरोधी पक्षातील एक बड्या ज्येष्ठ नेत्याने थेट ईडीकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, रत्नागिरीतील शिवसेनेच्या एका बड्या नेत्याचं नावही ईडीच्या रडावर असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

विधिमंडळातल्या आक्रमक भूमिकेला ईडीद्वारे प्रत्युत्तर? असे अंदाज लावणाऱ्या चर्चा सुरू झाल्या असल्या तरी यामध्ये कितपत तथ्य आहे ? याबाबत तपशीलवार माहिती समोर आली नाही पण या नेत्याची हॉटेल्स, शो रूम, रिसॉर्टच्या व्यवहारांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. तपासणी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत काहींना शंका असून याची चौकशी झाल्यास अनेक आर्थिक व्यवहार समोर येऊ शकतात त्यामुळे अनेकांच या विषयाकडे लक्ष लागून राहीलं आहे.

याचा फायदा कोकणामध्ये राजकिय दृष्टया कोणाला कसा होईल याचा अंदाज आत्ताच लावणे कठीण आहे तरी येत्या काळात राजकिय घडामोडी, प्रकल्पाबाबततची भूमिका व ईडीच्या चौकशी लावण्याची चर्चा याकडे अवघ्या कोकणाचेच नाही तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलं आहे.