राखी सावंतच्या नव्या प्रेमकथेत ट्विस्ट; BF च्या एक्स गर्लफ्रेन्डची एन्ट्री, म्हणाली…

WhatsApp Group

ड्रामा क्वीन राखी सावंतच्या आयुष्यात काही दिवसांपूर्वी एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. मात्र ड्रामा क्वीन राखी सावंतच्या नव्या प्रेमकथेमध्ये आता पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आहे. राखीच्या लव्ह लाईफमध्ये तिचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीच्या एक्स गर्लफ्रेंडने एंट्री घेऊन राखीला धक्का दिला आहे.

एक वृत्तानुसार, रोशिना देलावरी नावाच्या मुलीने राखी सावंतला फोन केला आणि दावा केला की ती ज्याला डेट करत आहे तो आदिल खान दुर्रानी तिचा प्रियकर आहे. रोशीनाने असा देखील दावा केला आहे की, ती आणि आदिल गेल्या 4 वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. रोशीनाने राखीला आदिलसोबत घालवलेले क्षणही सांगितले आणि तिला आदिलपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा प्रेमात पडली आहे. ‘बिग बॉस १५’नंतर पती रितेश व राखीचं कायमचं बिनसलं. दरम्यान, एका इव्हेंटमध्ये राखीने मीडियाशी आदिलची व्हिडीओ कॉलवर भेट करून दिली होती.