
यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. आता या परीक्षांचा निकाल लागणार आहे. आताच समोर आलेल्या माहितीनुसार, उद्या 12 वीचा निकाल लागणार (Result of 12th will be Announced Tomorrow) आहे. उद्या म्हणजे 08 जून रोजी राज्यातील 12 वीचा निकाल लागेल.
राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली होती. त्यानुसार उद्या म्हणजेच 08 जूनला बारावीचा निकाल लागणार आहे.
बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?
- बारावीचा निकाल पाहण्यासाठी अगोदर आपल्याला HSC बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – www.mahresult.nic.in
- वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला HSC Result 2022 ही लिंक दिसेल, या लिंकवर क्लिक करा.
- यात तुम्हाला एक रखाना दिसेल यात तुचा रोल नंबर आणि आईचे नाव भरा.
- यानंतर तुम्हाला ”View Result” हा ऑप्शन दिसेल, यावर क्लिक करा.